Sandhan Valley – An experience  0

महाराष्ट्रातील गड,, किल्ले अन घळया,,
आहेत खूप मजबूत,, सुंदर अन देखण्या त्यातीलच एक आहे संधान व्हॅली,
जिचा थरार आहे खूप भारी..

 

मुंबईहून निघताच पोचलो आम्ही सम्राद या गावी,,
तिथूनच सुरु झाली आमची खरी तयारी..

 

चहा, नाश्ता करून सुरु केली चढाई,,
पाहतो तो समोर छोटा ओढा दर्शन देई…

 

तिथे होते आमच्या सारखेच
दोन तीन ग्रुप,,
त्यांच्या सवे झाली
अवघड वाटही,,
एकदमच सुखरुप….

 

तेव्हाच घडले खरे
माणुसकीचे दर्शन,,
एकमेकांना साथ देत होते
अन करत होते,,
पाण्यातुन चालताना
संरक्षण…

 

जरी नसलो आम्ही ओळखीचे
तरी वाटले एकदम सखे सोबती,,
त्याच प्रवासात मग
खेळलो आम्ही साखळी साखळी..

 

नंतर चालू झाले रॅपलिंग,,
जणू की आमच्या ताकदीचे सॅम्पलिंग..

 

जेव्हा सोडले हात-पाय,,
आणि दिलं स्वतःला झोकून,,
तेव्हा कळलं की,
दऱ्या डोंगर चढणं
असतं खूपच कठीण..

 

पण हे जो पार करतो,,
तोच असतो खरा शूरवीर
बाकी सगळे नुसते असतात,,
बघे आणि सलामीवीर..

 

ह्या थरारात पण
एक वेगळीच नशा आहे,,
ते सांगण्यापेक्षा
अनुभवणं खूप जास्त
छान आहे..

 

-Trupti Wagholikar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Menu Title