Archives for : June 2007

Trek to Peb  2

रात्रीची १२.३० ची कर्जत [slow] लोकल पकडून नेरळ आणि नंतर पूढे चालत पेबला. आणि येताना माथेरान करून परत नेरळ,  “कसा वाटला plan? कोण कोण येतंय पेबला ? “ श्रीच्या ह्या प्रश्नावर सगळ्यांचा हात वर झाला. आत कधी जायच ते ठरवा आणि काय काय लागणार किती पैसे होणार हे पण ठरवा.

लागलीच सगळे रात्री कॉलेजला जमू लागले. “ हा ट्रेक पावसाळी आहे म्हणून चांगले बूट गरजेचे आहेत” तुषार म्हणाला. बूट आणि काय काय लागणार या आधी कोणी ट्रेक केला आहे का ? हा प्रश्न येताच सगळे एकमेकांकडे बघू लागले. श्री म्हणाला “ मी गेलोय पेबला.” तुषार म्हणाला “ मी या आधी गेलोय ट्रेकला” असे अजून दोघे तिघे होते मी ही होतो त्यात.

सगळे अनुभवी लोक [ट्रेक ला गेलेले.] सूचना करायला लागले. खर्चाची बेरीज सुरु झाली. इथून नेरळ २० रुपये  return ४० रुपये झाले. खायला ब्रेड-बटर, “ ब्रेड बटर सांडू आणेल” तुषार बोलला “नंतर त्याला पैसे देऊ. “ ठरल. आणि काय हवय पावसाळी ट्रेक आहे म्हणून? कपड्यांचा एक जोड, battery, first aid kit, “ ते झाल रे खर्चच बोला.” सुदर्शन म्हणाला. “सांगतो रे सगळ “ सगळे अनुभवी एक सुरात बोलले. “ कधी जायचा ? सुदर्शन परत. “ शनिवार रविवार “ श्री म्हणाला. “ अरे श्री तारीख, महीना सांग? सुदर्शन परत.

१४ जून २००७ हि तारीख ठरली. एक महिना आहे अजून तयारीला पण झालं उलट एक एक करून उत्साही ट्रेकर्स गाळायलाही लागले [कमी व्हायला लागले] हे इतकं झाला कि शेवटच्या आठवड्यात फक्त 3 जण उरले. मी [ वैभव सांडू], श्री, सुदर्शन.

तिघे तर तिघे आपण जाऊया ठरल. १४ ला रात्री म्हन्जे१५ ला रात्री १२.३०वा ची कर्जत [slow]  पकडली आणि झाला ट्रेक सुरु. रात्री सुमारे २-२.३० वाजता नेरळ स्टेशन आले. आता काय ? या प्रश्नाने आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. आजू बाजूला काही ट्रेकर्स दिसत होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळल कि मुक्काम हा स्टेशनवरच करायचा. एक बाकदा पकडला आणि त्यावर बसलो. झोपायचा प्रयत्न वायफळ आहे हे समझल्यावर प्रयत्न सोडून दिले. करायला काय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हत दुसरा ट्रेकर्स चा ग्रुप अनुभवी होता हे लक्सःत आलात्यांनी स्टेशन वर झोपायची पूर्ण तयारी केली होती.  आणि ते समोर मिनी ट्रेन च्या इथे जाऊन झोपले. आपण काय करावा या विचारात असताना एक पेपर मिळाला तो एवढासा होता कि त्यावर एकच जन झोपू शकत होता.दुसरा बाकड्यावर आणि तिसरा पहारेकरी. अस कधी झोपलो नसल्याने झोप क्नालाच येत नव्हती. नुसत पडून राहिलो होतो तर सुदर्शन येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघून त्यांना व त्यांच्या चालकांना सलामी देत होता.हे बघून त्याला चिडवण्याचा मोह झाला. त्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही पण सलामी देण थांबवल. थोड्या वेळाने गावकरी सामान घेऊन येताना दिसले.पहिली कर्जत सी एस टी येण्याची वेळ झाली होती. ती आली सगळे गावकरी त्यात बसून गेले. मग नवीन चर्चा सुरू झाली कि हे जातात कुठे ? दादर कि भायखळा मार्केट ? या चर्चेतून काही निष्पन्न झाली नाही पण वेळ चांगला गेला.

थोडस उजाडायला लागल होतं. श्री म्हणाला स्टेशन बाहेर जाऊ चहा पिऊ आणि पुढे गडाच्या पायथ्याला असलेल्या गावाकडे जाऊ. स्टेशन बाहेर आलो तर शुकशुकाट होता. चहाचा काही पत्ता नव्हता. तसेच पुढे चालत गेलो. सकाळचे ५-५.३० वाजले असतील. पुढे एक टपरी लागली तिथे श्री आणि सुदर्शन चहा प्यायले. टपरीच्या पुढे एक छोटा पूल होतातो ओलांडून गेलो नित दिसत नसल्यामुळे विचारत विचारत निघालो. एके ठिकाणी वळण होते ते घेतले आणि एका गावात आलो. गांव म्हणजे १०-१२ झोपड्यांची आदिवासी वस्ती. एव्हाना उजाडल होत. त्या वस्तीतल्या एका घराकडे जाऊन विचारलं पेबला कस जायचं? त्याने टाटा कंपनीचा वीज टोवर दाखवला तो बघत निघालो. पाय वाट सापडली तसा अंगात जोम आला. पुढे एक चढण लागलं आणि बारीक बारीक पाऊस सुरु झाला. तेवढ्यात सुदर्शनला निसर्गाची हाक आली. त्याला सांगितला कि एवढ चढण झाल कि जा पण हा ऐकेल तर खरं, तो गेला दुसऱ्या रस्त्याने आणि त्याच्या मागून श्री पण गेला. त्याला संडासला जागा मिळाली न मिळाली श्री परत आला त्याच्या मागून २ मिनिटाच्या आत सुदर्शन हजर  “ ढुंगण धुतला काय रे ? “ श्री ने विचारलं त्यावर  “ मोठ्या पानान पुसलं.” अस म्हणत सुदर्शन पुढे निघाला.

जंगलाची वाट होती. रस्ता मला आणि सुदर्शनला नवीन होता.श्री वर भरवसा ठेवून त्याच्या मागून चालत होतो.  “ अरे हा रस्ता लागल्याचे आठवत नाही मला.” श्री म्हणाला हे ऐकून काय करावे हे कळत नव्हतं एवढ्यात तिथे काही माणसांचा आवाज आला पुकारा देऊन आम्ही त्यांना बोलावून घेतला. त्यांना आम्ही आम्ही रस्ता चुकलो ते सांगितलं त्यावर ते म्हणाले “ या आमच्या मागून आम्ही तुम्हाला गडाच्या खाली सोडतो वर नाही येणार “ .“चालेल तिथे सोडा” एकमताने ठरलं. त्यांच्या मागून चालायला सुरुवात केली. तो एक धबधबा होता सुकलेलं पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. चालताना माझे पाय सटकत होते नंतर श्री आणि सुदर्शन चे सटकायला लागले.कारण तिथे शेवाळ होत.पण ते गावकरी मात्र स्लीपर घालून टणाटणउदय मारल्यासारखे चालत होते. धबधबा चढत असताना मला खूप दमायला झालं आणि पायात गोळे आले. श्री ने मसाज करून काढले आणि मला घेऊन कसेबसे वर गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला दुसरा ग्रुप भेटला बहुतेक हा स्टेशनवर भेटलेला ग्रुप असेल त्यांनी विचारल, “कुठून आलात” ? आम्ही मुंबई म्हणालो. त्यावर ते म्हणाले “कुठून म्हणजे, इथे कुठून आलात? आम्ही मळलेल्या मूळ वाटेवरून आलो. तुम्ही कुठून आलात” ? त्यावर त्यंना आम्ही आलो ती जागा दाखवली.ते बघतच बसले आमच्याकडे. कारण आम्ही धबधब्यातून आलो होतो. तिथून पुढे गेलो तेव्हा तिथे केळीचंबन दिसलं. आमच्या बरोबर आलेले गावकरी तिथे ते केळीचे खांब कपात होते. ते लोक कोवळ्या केळीच्या खांबाला उसा सारखा सोलून खात होते. त्यांना हात दाखवला आणि पुढे निघालो तर पुढे एक दगड होता त्याच्या मध्यभागी एक फट होती त्या फटीतून तो दगड चढायचा कि पुढे मग पायवाट होती. गडापर्यंत तो दुसरा ग्रुप त्या दगडा कडे येऊन थांबले तोवर श्री ने कस वर चादाह्यचा ते दाखवलं.त्यःच्या मागून सगळ सामान वर पाठवलं आणि दुसऱ्या ग्रुप ला वर जायला सांगितला. कोणी तयार होईना. मग सुदर्शन ने मला वर जायला सांगितल कारण त्या सगळ्यात मी वजनदार आणि आकाराने मोठा होतो [अजूनही आहे]. सुदर्शन “ हा वर गेला तर सगळे जाऊ शकतात.” मी लगेच वर गेलो. ती फट एवढी अरुंद नव्हती जेवढी कि बाहेरून वाटतं होती. मी वर गेल्यावर त्या ग्रुप मधले दोन तीन जण वर आले. मग सुदर्शनला वर घेतल आणि आम्ही पुढे निघालो.

पुढे जातो न जातो तोच ढग भरून आले. समोर दिसेनासं झाल. पायाखालची पाऊलवाट आणि एकमेकांचा हात न सोडता पुढे जायला लागलो. तुथे आम्हाला ध्वजस्तंभ दिसला. पुढे काळोख झाला. काय करावा सुचत नव्हत. आम्ही ध्वज्स्ताम्भाच्या आधाराने तिथे बसलो आणि पावसाला सुरुवात झाली. कोणीतरी आपल्यावर बारीक दगडांचा मारा करत आहे अस वाटत होत. थंड हवेमुळे श्री आणि सुदर्शन कापत होते, खास करून सुदर्शन. पावसाचा मारा सहन केला. नंतर अचानक ढग नाहीसे झाले आणि आम्ही हबकलो कारण त्या ध्वज्स्तंबाच्या दोन्ही बाजूला दरी होती.

पायवाट उतरलो तेव्हा कळल कि आपण जो रस्ता पकडला होता तो बरोबर होता. पण वर न जाता दरी कडे जाणारा रस्ता घ्यायला हवा होता.  थोडसं चालल्यावर पुढे एक प्रशस्त गुहा लागली. ती गुहा म्हणजेच गड.

तिथे मुक्काम करून नष्ट करूयात या बेतात आम्ही बॅग टाकल्या जमिनीवर आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळला. त्या गुहेत दोन छोट्या गुहा होत्या त्य पहिल्या आणि मग नाश्ता केला.  तेव्हा एक ग्रुप दुसऱ्या बाजूने येतान दिसला. “ते कसे आले ? “ म्हणून विचारल आणि मग त्यांची बरोबर निघालो.पुढे गुहा उतरून गेल्यावर एक पाण्याचा टाक लागला तिथे पाणी भरून घेतल. एक लोखंडाच्या शिडी कडे हात करत एक जणम्हणाला ह्या शिडी ने वर जा . त्याच्य्हा सांगण्यानुसार  वर गेलो तर वर अजूनही काही लोक होती.त्यांनी आम्हाला विचारला कि,  “खाली कोणी आहे का म्हणून ?” त्यावर आम्ही “दोघ तिघ आहेत.” अस सांगितल. “ते आमचे ग्रुप मधले आहेत पाणी भरायला गेलेत ते आलेच नाहीत अजून” म्हणून विचारल. त्या ग्रुप ला मागे सारून पुढे निघालो तेव्हा समजल कि गड म्हणजे गुहा नाही. ती गडाचा एक भाग आहे.

तिकडे सगळ्या गोष्टी ज्या बघण्य सारख्या होत्या त्या बघून पुढे गेलो. तर एक माणूस भेटला त्याने आम्हाला सांगितला कि इथे एक दत्त मंदिर आहे. आम्ही त्याचा शोध घेत पुढे निघालो.दत्त मंदिराच्या इथे आलो तर तिथे अजून एक गोष्टं कळली.ती म्हणजे पुढे एका ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत. तिथे गेलो तर तिथे एवढी जोरदार हवा चालू होती कि चालण सोडा उभा राहता येत नव्हत. पाय वेडे वाकडे पडत होते आणि पादुकांच्या इथे जाण्याचा रस्ता इतका अरुंद होता कि एकावेळी एकच माणूस जाऊ शकत होता. आता जायच तर होतच. शेवटी आम्ही ठरवल कि गुड्ग्यावर रांगत जायचं आणि दर्शन करून यायच. ह्या पादुका अगदी टोकावर आहेत. रांगत रांगत आम्ही वर पोहोचलो. दर्शन घेतल आणि माथेरानचा रस्ता धरला. थोडं अंतर चालत गेल्यावर एक शिडी लागली तिच्यावरून खाली उतरलो. उतरल्यावर आम्ही सहज त्या शिडीकडे पाहिल तर ती शिडी म्हणजे छोटी toy train रेल्वे चे रूळ आहे. त्या रस्त्याने जात असताना सुदर्शनला अचानक शाळेचे दिवस आठवले. शाळेत असताना १०वी ची सहल माथेरान ला आली होती. मी आणि सुदर्शन शाळे पासून चे मित्र त्यामुळे आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या श्री आम्हाला नुसती साथ देत होता.

या आमच्या गप्पा मारण्याच्या नादात कधी आम्ही रेल्वे रुळावर आलो कळलच नाही.  “ इथून डावीकडे जायच” श्री म्हणाला पण सुदर्शन उजवी कडे वळला कारण श्री ने दोन वेळा चुकवल होत. उजवीकडे चालत गेल्यावर दस्तुरी लागल. आता टॅक्सी करायची कि चालत जायच ? चालत जायच ठरलं. परत आलो तस रुळावरून मागे फिरलो. आणि उतरायला सुरुवात केली. ९ कि.मि आहे रे ! अस म्हणत उतरायला लागलो. पुढे एक फाटक  लागलं. तिथून डांबरी रस्ता पकडला. तिथून पुढे जातो न जातो तोच मी पडलो, पाय घसरून. मला पडलेल बघून श्री आणि सुदर्शनच हसणं थांबतच नव्हत. कसाबसा उठलो आणि चालायला सुरुवात केली आणि परत पडलो. आता मलाही हसायला आलं. तो उतार मागे गेला आणि एक वळण आलं तिथून नेरळ दिसत होतं. “ आल नेरळ, हे काय दिसायला लागल.”

आनंदात पुढे चालायला सुरुवात केली. एके ठिकाणी मुतायला थांबलो आणि विश्रांती घेऊ म्हणून टेकलो तिथे बोलता बोलता मी परत घसरून पडलो ढुंगणावर. आता माझं ढुंगण दुखत होतं आणि जी हाफ पँट मी घातली होती तिच्यावर छापे पडले होते. आराम करून परत चालायला सुरुवात केली. माल चालवत नव्हत. एका ठिकाणे रिक्षा दिसली त्या रिक्षावाल्याला विचारलं तर तो माणशी २०-३० रुपये घेईन म्हणाला. हे ऐकून सुदर्शन तरातरा चालायला लागला. आता ह्याला एकत कसा सोडणार म्हणून आम्ही पण त्याच्या मागून चालत सुटलो. आता नेरळ दिसेनासं झालं. आपण परत चुकलो कि काय हा विचार मनात आला. कारण आधी खूप वेळा रस्ता चुकलो होतो.

शेवटी एकदा डोंगराळ वळणा वळणाचा रस्ता संपला. आता स्टेशनला कस जायच? हा विचार करत होतो इतक्यात समोरून एक माणूस येताना दिसला. त्या माणसाला स्टेशनचा रस्ता विचारला. त्याने सांगितल तस त्या रस्ताने निघालो. काही वेळाने तो पूल दिसला जिथे आम्ही येताना चहा प्यायलो होतो. मग जीवात जीव आला कारण आता चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता. स्टेशन कडे जात असताना हॉटेल्स लागायला लागली तशी भूक चाळवली गेली आणि मग आम्ही एका हॉटेल मध्ये शिरलो. तिथे पोटभर खाऊन मग स्टेशनवर आलो. स्टेशन वर आल्यावर आजूबाजूच्या लोकांकडे बघून समजल कि अंगावरचे कपडे ओले आणि मळलेले आहेत. कपडे बदलायचे आहेत पण कुठे आणि कसे बदलणार. मिनी रेल्वेच्या इथे गेलो.  तर तिच्या एका डब्याचा दरवाजा उघडा दिसला. मग काय आत जाऊन कपडे बदलून अंग कोरडे करून परत बाहेर आलो.

ट्रेन आली ती पकडली. रविवार असल्यामुळे बसायला जागा मिळणं शक्य नव्हत. गर्दी बघून आम्ही मागच्ही ट्रेन पकडू असा निर्णय घेतला. मागून आलेली ट्रेन पण खाचाकचभरलेली. कर्जत हा ट्रेक आणि पिकनिक स्पोट असल्यामुळे खूप गर्दी असते आणि ट्रेन पण तिथेच खूप भरतात. होय नाही करत आलेली ट्रेन पकडली आणि परतीचा प्रवास सुरु झाला.

या ट्रेक मधल्या महत्वाच्या घडामोडी म्हणजे, श्रीच या ठिकाणी २ ते ३ वेळा येऊन सुद्धा वारंवार चुकण, सुदर्शनची कटकट तोंडाची आणि ढुंगणाची. वरून आवाज बंद केला कि खालून आवाज सुरु. हा माणूस ह्या ट्रेक ला अविरत बोलत आणि पादत होता. या व्यतिरिक्त माझा म्हणाल तर मी फक्त चालत नव्हतो तर पडत होतो. माझ्या एवढा कोणीही घसरून पडला नसेल.ट्रेन मध्ये मी दरवाज्या जवळ उभा होतो. नंतर वारा लागायला लागला तसा झूपात पण होतो. गर्दी मुळे सुदर्शन आणि श्री ह्यांच काय चालू आहे ते कळत नव्हतं.

कल्याण आल्यावर बसायला जागा मिळाली. ती पण ह्या दोघांबरोबर आणि मग काय छान झोपलो. तो दादर आल्यावर श्री ने उठवल. त्याला निरूप दिला आणि मग मी आणि सुदर्शन गप्पा मारायला लागलो.

तेव्हा सुदर्शन म्हणाला, “ हि माथेरानची मजा आपण शाळेत असताना कधीच अनुभवली नसती कारण आता शाळा नुकतीच सुरु झाली असती.”

 

-Vaibhav Sandu